महाराष्ट्र

पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात अदयावत कोविड आरोग्यश केंद्राचे झाले उद्घाटन!

गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या कोराना बाधित रुग्णांना मिळणार तात्काळ वैद्यकीय उपचार!

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता शासन निर्देशानुसार समर्पित कोविड आरोग्यी केंद्र सुविधा निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत CCC, DCHC, DCH सुविधा उभारण्यात येत आहेत. तीव्र स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी ICU सुविधायुक्त DCH उभारण्याची मागणी करण्यात येत होती. मिरा-र्भाइंदर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेनं दिवस वाढत चालले असून ही आवश्यकता लक्षात घेऊन पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह येथे महानगरपालिकेमार्फत DCH उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. सदर काम पूर्णत्वास गेले असून दि. ०९/१०/२०२० रोजी सकाळी ११.०० वा. मा. महापौर, सौ. ज्योत्सना हसनाळे यांच्या हस्ते व मा. खासदार श्री. राजन विचारे, मा. आमदार श्री. प्रताप सरनाईक, मा. आमदार सौ. गीता जैन, मा. उपमहापौर श्री हसमुख गेहलोत, मा. आयुक्त डॉ. विजय राठोड, मा. स्थायी समिती सभापती श्री. अशोक तिवारी, मा. सभागृह नेता श्री. प्रशांत दळवी, मा. विरोधी पक्षनेता श्री. प्रविण पाटील, सन्मा. गटनेते, सन्मा. स्थानिक नगरसेवक/नगरसेविका व इतर पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे अति. आयुक्त श्री. दिलीप ढोले, उपायुक्त व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सदर DCH सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.
पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या तळमजल्यावर ८० खाटांचे अद्ययावत असे DCH उभारण्यात आले आहे. सदर ठिकाणी ४० खाटा ऑक्सीजन सुविधायुक्त आहेत व ४० खाटा ICU सुविधायुक्त आहेत. ICU च्या ४० खाटांपैकी २० खाटांना व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध केली आहे.
उपरोक्त ठिकाणी खालील नमूद सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याच प्रमाणे या आरोग्य केंद्रात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी लिक्विड ऑक्सिजन प्लान्ट व सेंट्रल ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय तज्ञ व इतर कर्मचारी वर्ग पुरवठा करणेबाबत मे. ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीसोबत करारनामा करुन कार्यादेश देण्यात आलेला आहे. रुग्णांवर उपचार करणेसाठी वैद्यकीय तज्ञ व इतर कर्मचारी 24 X 7 उपलब्ध राहणार आहेत. रुग्णांसाठी X-Ray सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दाखल रुग्णांच्या विविध चाचण्यांसाठी पॅथॉलॉजी लॅब निश्चित करण्यात आलेली आहे. रुग्णांसाठी पंखे, खान-पानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले असून रुग्णांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close