टॉप न्यूज़

हिरव्यागार झाडांची ''कत्तल'' करून मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने साजरा केला "जागतिक पर्यावरण दिवस"

Jun 5 2020 8:50PM

5 जुन, भाईंदर ( प्रतिनिधी) : स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधण्यासाठी मानवजातीने पर्यावरणाची आतोनात हानी केली आहे आणि आता त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत आणि म्हणून मानवजातीने  निसर्ग - पर्यावरण, जलजीवन, सृष्टीशी चालवलेला अमानुष क्रूर खेळ थांबवणे ही काळाची गरज बनली आहे परंतु याला मिरा भाईंदर महानगरपालिकेचा उद्यान विभाग मात्र अपवाद ठरत असून ज्या विभागावर शहरातील झाडांचे रक्षण करणे त्यांचे संगोपन करणे, नवीन झाडे लावून शहरातील हिरवळ कायम राखण्याची जबाबदारी आहे तेच उद्यान विभाग मात्र झाडांची आतोनात कत्तल करीत आहेत. आज सगळीकडे  "जागतिक पर्यावरण दिवस" साजरा केला जात असताना मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमेकडे बालाजी नगरमध्ये मात्र हिरव्यागार झाडांची कत्तल केली जात होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही झाडांची कत्तल केली जात असताना या प्रभागातील स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती अशोक तिवारी मोठ्या हौसेने पोज देऊन त्याचे फोटो काढून सोशल मीडीयावर टाकीत होते. यावरून मिरा भाईंदर शहरातील उद्यान विभाग पर्यावरणाच्या रक्षणासाठी किती गंभीर आहे आणि शहरातील झाडांचे रक्षण करण्यासाठी किती तत्पर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील तथाकथित "उद्यान अधिक्षक" ''हंसराम मेश्राम'' आणि ''नागेश इरकर'' या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने विकास कामाला बाधीत ठरत असल्याचे कारण सांगून आज पर्यंत पूर्ण वाढ झालेल्या हजारों झाडांची अमानुष कत्तल केली आहे. त्याच्या विरोधात अनेक पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळा तक्रार करून देखील त्या तक्रारींना केराची टोपली दाखवून आजतागायत ही झाडांची कत्तल सुरूच ठेवली आहे. ज्या झाडांची कत्तल केली जाते त्याचा पंचनामा किंवा सर्वेक्षण अहवाल तयार केला जात नाही. जी झाडे तोडली जातात त्यांची लाकडे कुठे घेऊन जातात? त्याची विल्हेवाट कशी लावली जाते? त्या लाकडांची विक्री कुठे केली जाते? याची कोणत्याही प्रकारची नोंद उद्यान विभागाने ठेवलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करून त्यांच्या लाकडांची चोरटी विक्री करण्यासाठीच शहरातील हिरव्यागार झाडांची कत्तल केली असल्याचा आरोप केला जात आहे. 

नागरी परिसरातील हिरव्या झाडांची तोड करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) मार्गदर्शक तत्वे आखून दिलेली आहेत. त्याच प्रमाणे शहरातील झाडांची तोड करण्यासाठी निर्बंध घालून वेळोवेळी आदेश पारित केलेले आहेत आणि हे सर्व आदेश महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे आहेत परंतु मिरा भाईंदर महानगरपालिकेचे उद्यान विभाग मात्र या सर्व नियमांची पायमल्ली करून राजरोसपणे झाडांची कत्तल करीत आहेत.

संपूर्ण जगात पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीमुळे बदलते हवामान, मानवजातीचे, आपल्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला झाडं, जंगल, डोंगर, नदी, तलाव, खाडी, समुद्र आणि त्यातील जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन व आदर करणे महत्वाचे तर आहेच परंतु लोकप्रतिनीधी, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य नागरीक  या सर्वांचे कर्तव्य देखील आहे परंतु ज्या नगरसेवक आणि उद्यान विभागातील अधिकारी यांच्या पर्यावरणाच्या रक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी असताना तेच शहरातील पर्यावरणाचा नाश करण्यासाठी  सरसावले असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून या उद्यान विभागातील अधिकारी आणि नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आता केली जात आहे. 

प्रतिक्रिया

View all Comments

Visitor

Visitor Name : Francis Lobo

Email : Francis.handfoundation@Gmail.com

Comments : This is really a shame when we can''t protect the nature on the day that''s dedicated for it... Killing of trees has been on the rise across the city... Seems like with Corona Mbmc is more interested in destroying the nature than build a strong plan to fight back this pandemic situation

05/06/2020


Make it modern

Popular Posts