टॉप न्यूज़

लाॅकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठाणे ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई! लाॅकडाऊनची मुदत 18 जुलैपर्यंत वाढविण्यात आली!

Jul 11 2020 2:18PM

भाईंदर (प्रतिनिधी): मिरा-भाईंदर शहरामध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूची संख्या पाहता लोकप्रतिनिधीं कडून सातत्याने पुन्हा लॉक डाऊनची मागणी केली जात होती. त्या अनुषंगाने 1 जुलै पासून 10 दिवसां करिता पुन्हा लॉकडाऊन केले होते त्याची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर पुन्हा आठ दिवसासाठी म्हणजेच पुढील 18 जुलैपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णय महानगरपालिके कडून घेण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड व अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शन खाली मिरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी पुन्हा नाकाबंदी आणि गस्त  वाढवली असून शहरातील अनेक रस्ते बॅरेकेटींग करून बंद करण्यात आले आहेत. मिरा-भाईंदर मधील ६ पोलीस ठाण्यात गेल्या आठ दिवसात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्देशांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 145 गुन्हे दाखल करण्यात येऊन 290 वाहने जप्त केली आहेत. नाहक फिरणाऱ्या 608 लोकांवर कारवाई केली आहे . 

 

पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी आणि डॉ. शशिकांत भोसले यांच्या निर्देशा नुसार मीरा भाईंदर मधील 6 पोलिस ठाण्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सर्वात जास्त कारवाई काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी केली आहे. साथरोग नियंत्रण कायद्या प्रमाणे 41 गुन्हे दाखल केले असून 108 वाहनं जप्त केली. मॉर्निंगवॉक, मास्क नसणे यासाठी 205 जणांवर कारवाई केली. तर दारूबंदीचा 1 गुन्हा दाखल केला आहे. 

 

भाईंदर पश्चिमचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी 39 गुन्हे दाखल केले असून 74 वाहनं जप्त करून 121 लोकांवर कारवाई केली. दारूबंदीचा 1 गुन्हा दाखल केला. नवघरचे निरीक्षक संपत पाटील यांनी त्यांच्या हद्दीत 151 लोकांवर कारवाई करत 15 गुन्हे दाखल केले तर 16 वाहने जप्त केली. 

 

नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांनी 30 गुन्हे दाखल करून 52 वाहने जप्त केली व 88 लोकांवर कारवाई केली. मिरारोडचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांनी 25 वाहने जप्त करत 15 गुन्हे दाखल करून 23 लोकांवर करवीर केली. उत्तन सागरीचे सहाय्यक निरीक्षक सतीश निकम यांनी 15 वाहने जप्त करून 5 गुन्हे दाखल केले व 19 लोकांवर कारवाई केली. दारूबंदीचा एक गुन्हा सुद्धा दाखल केल्याची माहिती डॉ. शशिकांत भोसले यांनी दिली आहे.

मिरा-भाईंदर शहरातील लाॅकडाऊन पुढील आठ दिवसांसाठी वाढविण्यात आलेला असून पोलिसांची ही कारवाई यापुढे ही अशीच चालू राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये तसेच प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन ठाणे ग्रामीण पोलीसांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

View all CommentsMake it modern

Popular Posts