अधिक वाचा

संतोष जुवेकर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत

Mar 28 2019 12:00AM

अभिनेता संतोष जुवेकर सध्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रोजक्टच्या तयारीत व्यस्त आहे. एप्रिल महिन्यात संतोष जुवेकर एका जर्मन फिल्ममध्ये काम करणार आहे. ह्या फिल्मच्या वर्कशॉप्समध्ये सध्या व्यस्त असलेल्या संतोषचे हे पहिले इंटरनॅशनल प्रोजेक्ट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, ह्या जर्मन फिल्मचे नाव डिसोनन्स असे असून ही सायन्स फिक्शन फिल्म आहे. ह्यात संतोष जुवेकर पिटर ह्या आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी संतोषने गेले काही महिने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. योग्य आहार आणि जिम ट्रेनिंगव्दारे त्याने आर्मी ऑफिसरसारखा फिटनेस मेन्टेन केला. त्याचप्रमाणे त्यांच्या फिजीकल अपिअरन्स आणि वागण्या-बोलण्याच्या पध्दतींचाही बारकाईने अभ्यास केला. सध्या एका जर्मन शिक्षकाकडून तो जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेत आहे.

प्रतिक्रिया

View all Comments