अधिक वाचा

प्रियांका गांधी नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसीतून लढणार ?

Mar 28 2019 12:00AM

रायबरेलीमध्ये एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते प्रियांका गांघींना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं. रायबरेली, २८ मार्च : प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढावी म्हणून त्यांना आग्रह करतायत.रायबरेलीमध्ये अशाच एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं. उत्तर प्रदेशात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवतायत. म्हणूनच वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियांका गांधी अशी लढत असणार का, असाही प्रश्न विचारला गेला. सोशल मीडियावर या चर्चेला आणखीनच वेग आला.

प्रतिक्रिया





View all Comments