अधिक वाचा

मुंबईत चोरीचे प्रमाण दुप्पटीने वाढले

Apr 15 2019 12:00AM

मुंबई - मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईत 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार सीसीटीव्ही कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही. कारण गेल्या सहा वर्षात 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई पोलिसांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई पोलीस विभागाकडे 2013 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. तसेच, किती गुन्ह्याची उघड झाली आहे आणि किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाली आहे. तसेच पोलिसांनी किती किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहे याबाबत माहिती विचारली होती. त्यानुसार मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) रमेश गावित यांनी शकील अहमद शेख यांना दिलेल्या माहितीवरून मुंबईत जबरी चोरीचे प्रमाण दुपट्टीने वाढले असल्याचं स्पष्ट होत आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे मुंबईत जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 4674 जबरी चोरीचे गुन्ह्यांची नोंद झाली असून एकूण 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख जबरी चोरी झाली आहे. तरी पोलिसांनी फक्त 16 कोटी 75 लाख 46 हजार 295 रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केले आहेत. म्हणजे फक्त 37 टक्के मालमत्ता किंवा रोख हस्तगत केले आहेत. 2013 मध्ये एकूण 2925 घरफोडीच्या गुन्ह्यात 555304754/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 82979967/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2014 मध्ये एकूण 3055 घरफोडीच्या गुन्ह्यात 600157791 रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 90855413/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2015 मध्ये एकूण 3010 घरफोडीच्या गुन्ह्यात 661103303/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 138490424/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच 2016 मध्ये एकूण 2552 घरफोडीच्या गुन्ह्यात 432848922/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 69039772/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत.

प्रतिक्रिया

View all CommentsMake it modern

Popular Posts