अधिक वाचा

कांदळवणाची कत्तल प्रकरण भोवले आमदार नरेंद्र मेहतावर गुन्हा दाखल

Sep 19 2019 12:00AM

७-११ क्लबच्या बांधकामात अनेक नियम डावलून आणि कांदळवणाची कत्तल करून हा क्लब उभारल्या प्रकरणी मीरा-भाईंदर शहराचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याच प्रमाणे या प्रकरणाची चौकशी एका स्थायीय गुन्हे शाखा अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखा यांचे मार्फत करावी असे देखील आपल्या आदेशात नमूद केले आहे . या ७-११ क्लबच्या बांधाकाम मंजुरी प्रकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तां पासून अनेक अधिकाऱ्या नीं नियम डावलून बांधकाम परवानगी दिली आहे. याबाबत पत्रकार धीरज परब यांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील महानगरपालिका प्रशासन कारवाई करीत नव्हते शेवटी धीरज परब यांनी उच्च न्यालायात याचिका दाखल केली त्यानंतर न्यायालयाने आदेश देत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत . न्यायालयाच्या आदेशानुसार मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे इतर भागीदारांसह मीरा भाईंदर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांना आरोपी ठरविण्यात आले आहे. पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया

View all Comments