अधिक वाचा

प्रभाग चारमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट! प्रभाग अधिकाऱ्याचे मात्र अर्थपूर्ण रित्या दुलक्ष !

Feb 13 2020 12:00AM

मिरा- भाईंदर महानगरपालिका परिक्षेत्रातील प्रभाग क्र. ०४ मधील वार्ड क्र. १३ मध्ये जीसीसी हाटकेश सिग्नल रोड वर हाटकेश उद्योग नगर या ठिकाणी अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. या गाळ्यांचे बांधकाम करण्यासाठी विकासकाने नगररचना विभागाची परवानगी घेतली नसून सदर बांधकाम बेकायदेशीर रित्या करण्यात आले आहे. या अनधिकृत गाळ्याच्या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या असून देखील प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. नरेंद्र चव्हाण यांच्या प्रभागात अशाच प्रकारे अनेक अनधिकृत बांधकामं करण्यात आली असून देखील नरेंद्र चव्हाण मात्र या बांधकामावर कारवाई करण्यात जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या काही दिवसांत प्रभाग चार मध्ये अनेक बांधकामं करण्यात आलेली आहेत. या बांधकामा विरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आलेल्या असून प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण या अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत नसल्याने आता त्यांच्या विरोधात काही समाज सेवक आणि काही पत्रकार भाईंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात धरणं आंदोलन करत आहेत. त्यांनी मागणी केली आहे कि नरेंद्र चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात यावेत परंतु महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे अनधिकृत बांधकाम करणारे आणि महापालिका प्रशासनातील अधिकारी यांचे साटंलोटं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.

प्रतिक्रिया

View all Comments