अधिक वाचा

कोरोना वायरसशी मुकाबला करण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन सज्ज! आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली माहिती !

Mar 6 2020 12:00AM

संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना वायरस या आजारा पासून बचाव आणि जनजागृती करण्या करिता दि. 06/03/2020 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका महासभा सभागृह, तिसरा मजला, भाईंदर (प.) येथे मनपाच्या सर्व नागरसेवकांची कोरोना आजारापासून (COVID-19) बचावासाठी खबरदारीचे उपाय व दक्षता, तपासणी, उपचार व जनजागृती यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती देणेकरीता एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महापौर ज्योत्स्ना हस्नाळे, उपमहापौर हसमुख गहलोत, आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त (वैद्यकीय) डॉ. संभाजी पानपट्टे व इतर काही नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना आजारा विषयी सविस्तर माहिती दिली तसेच या आजाराबाबत नागरीकांनी घाबरुन न जाता सावध राहावे. तसेच वैयक्तीक स्वच्छता बाळगावी व संतुलित आहार घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा अनावश्यक वापर टाळावा व अधिक माहिती करीता नागरीकांनी मनपा/शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रे येथे संपर्क साधावा असे आवाहन मा. आयुक्त यांनी केले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन देखील या आजारा पासून मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आयुक्त यांनी सांगितले. महानगरपालिका क्षेत्रात कस्तुरी रुग्णालय, तुंगा रुग्णालय, भक्तीवेदांत रुग्णालय, वोकार्ड रुग्णालय, शहा लाईफलाईन रुग्णालय या खाजगी रुग्णालयात तात्काळ विलगीकरण कक्ष (Isolation Ward) स्थापन करणेबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कोरोना आजारासंदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीमध्ये सध्या कोरोना बाधित देशांमधून कार्यक्षेत्रात आलेल्या प्रवाशांना भेट देऊन त्यांना 14 दिवस घरी (Isolation) राहणेकरीता समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच त्यांना ताप, सर्दी, खोकला, श्वसनास त्रास अशी लक्षणे सुरु झाल्यास तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत संबंधित प्रवाशास दररोज संपर्क करुन पाठपुरावा करण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोना बाधित देशांमधुन 10 प्रवासी कार्यक्षेत्रात आलेले असून सर्व प्रवाशांची आरोग्य स्थिती चांगली आहे. कोरोना आजारासंदर्भात शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची माहिती देण्याकरीता दि.14/02/2020 रोजी मनपाच्या सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांना यासंदर्भात प्रशिक्षित केलेले आहे. दि.05/03/2020 रोजी संध्या 05:00 वाजता मा. आयुक्त दालन, मुख्य कार्यालय, भाईंदर (प.) येथे मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय मिरा भाईंदर येथील वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्षेत्रातील कस्तुरी रुग्णालय, तुंगा रुग्णालय, भक्तीवेदांत रुग्णालय, वोकार्ड रुग्णालय, शहा लाईफलाईन रुग्णालय या खाजगी रुग्णालयांचे डाक्टर्स, भाईंदर मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, फार्मसी असोसिएशन यांचे पदाधिकारी, मनपा शिक्षणाधिकारी यांची COVID-19 (कोरोना व्हायरस) च्या प्रतिबंधासाठी करावयाच्या विशेष उपाययोजनांबाबत चर्चा विनिमय व माहिती देणेकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मनपामार्फत कोरोना आजारापासून बचावासाठी खबरदारीचे उपाय व दक्षता, तपासणी व उपचार यासंदर्भात जनजागृतीकरीता 12-15 मोक्यांच्या ठिकाणी होर्डीग्ज तसेच सर्व खाजगी रुग्णालये, दवाखाने, शाळा, कॉलेज, रहिवासी सोसायटया व इतर महत्वाच्या ठिकाणी स्टिकर्स लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या. कोरोना आजारासंदर्भात करावयाची जनजागृती, प्रसार टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, इ. बाबत दि.05/03/2020 रोजी संध्याकाळी पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती. सध्या कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेमार्फत उपायुक्त (वैद्यकीय) यांच्या नियंत्रणाखाली कोरोना आजाराविषयी अधिक माहितीकरीता 24 तास 022-28117102 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध केलेला आहे.

प्रतिक्रिया

View all Comments