अधिक वाचा

सर्व जीवनावश्यक वस्तूची दुकानं आणि सेवा चालू राहणार आहेत तरी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करून नये ! - चंद्रकांत डांगे, आयुक्त मिरा-भाईंदर

Mar 25 2020 12:00AM

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी : काल रात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवसांसाठी लोकडाऊन जी घोषणा केली असून संपूर्ण देशासाठी हा लोकडाऊन असेल असे जाहीर केले आहे. पंतप्रधांनांनीं हि घोषणा करताच संपूर्ण देशभरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती आणि त्यामुळे मिरा भाईंदर शहरात रस्त्यावरची गर्दी अचानकपणे खूपच वाढलेली दिसत होती. त्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर शहराचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले आहे की जरी दि. १४ एप्रिल पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आलेली असली तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व जीवनावश्यक वस्तू उदा. किराणा, भाजीपाला, औषधी, दूध, बेकरी,पेट्रोल, डिझेल, बॅन्क, ATM इ. च्या आस्थापना नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या दुकानांवर गर्दी करू नये. वस्तू घेताना कृपया रांग लावून व १ मीटर अंतर ठेऊनच घ्याव्यात. कारण 'कोरोना' व्हायरसचा प्रसार संपर्कातूनच होतो. आपणा कोणासही ज्ञात नसेल की गर्दीमधील कोणती व्यक्ती कोरोनाबाधित आहे ते. त्यामुळे नागरिकांनी social distancing पाळणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मनपातर्फे काही नवीन तात्पुरते भाजीपाला मार्केट तयार करण्यात येणार आहेत. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला पुरविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जास्त घाबरून जाऊ नये. शिस्तीने आवश्यक वस्तूंची खरेदी करावी. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. विनाकारण घराबाहेर पडू नये. आनंदाची बातमी आहे की शहरातील Home Quarantine मधून मुक्त करण्यात येणा-या व्यक्तिंची संख्या वाढत आहे तसेच आजपर्यंत शहरात कोरोनाबाधित एकही रूग्ण सापडलेला नाही. पण यापुढे रूग्ण आढळणारच नाही, असं निश्चितपणे सांगता येणार नाही. ते टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्यतो घरीच रहावे. रस्त्यावर व दुकानात विनाकारण गर्दी करणे टाळावे. मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी कृपया प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे. गेल्या २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यादिवशी दिवसभर तर लोकं घराच्या बाहेर पडली नव्हती मात्र संध्याकाळी पाच वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजविण्याचा बहाण्याने मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेली दिसली. आताही तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज असून आवश्यक ती सर्व खबारादारी घेतली जात आहे. परंतु एक नागरिक म्हणून आपणही या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असून स्वतःला आणि दुसऱयांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनावश्यक गर्दी करण्याचे टाळणे हे महत्वाचे आहे.

प्रतिक्रिया

View all Comments